सोशल मीडियावर तलवारीचा फोटो ठेवणे पडले महागात… लग्नात भेट म्हणून मिळाली धारदार तलवार…

7

जालना, ११ जानेवारी २०२४ : सोशल मीडियावर धारदार तलवारीचे फोटो ठेवणे एकास चांगलेच महागात पडले आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कौठाळा येथे राहणाऱ्या सतीश रामकिसन साबळे, वय ३३ याने आपल्या सोशल मीडियावर धारदार तलवारीचा फोटो मोठ्या ऐटीत टाकला होता. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला लागताच त्यांनी सतीश साबळे यांना त्यांच्या तलवारीसह ताब्यात घेतले आहे.

याविषयी चौकशी करता, सहा महिन्यापूर्वी लग्नात भेट म्हणून ही तलवार मिळाली असल्याचे साबळे यांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साबळे यांच्या घरी झडती घेतली असता. त्यांना ती तलवार घरातील कपाटावर ठेवलेली मिळाली. त्याने ही तलवार कोठून आणली?, किती रुपयांत आणली?, किंवा त्याला ही तलवार भेट स्वरूपात कोणी दिली?, याबाबतचा तपास घनसावंगी पोलिस करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा