कॅनडाच्या अलबर्टामध्ये विमान कोसळून सहा जणांचा मृत्यू

कॅनडा, ३० जुलै २०२३ : कॅनडाच्या अलबर्टामध्ये विमान कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कॅनडाच्या पोलिसांनी यांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अलबर्टा प्रांतातील कॅलगरीच्या पश्चिमेला एक लहान विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी सांगितले की, पायलट आणि पाच प्रवाशांसह विमानाने स्प्रिंगबँक विमानतळावरुन उड्डाण केले आणि सॅल्मन आर्म, ब्रिटिश कोलंबियाकडे निघाले होते. ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले हे विमान सिंगल इंजिन पाईपर पीए-३२ होते. बोर्ड अपघाताची चौकशी करत आहेत.

रॉयल कॅनेडियन एअर फोर्सचे हक्र्युलस विमान कोसळलेल्या विमानांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. या शोध करणाऱ्यानी तब्बल ६० किलोमीटरचा परिसर शोधून काढला आहे. पाठवण्यात आलेले हक्र्युलस आणि अलबर्टा पार्क्स माउंटनच्या बचाव पथकाने घटनास्थळी कोणीही जिवंत राहिले नसल्याची पुष्टी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा