केरळ मध्ये विमान धावपट्टी वरून घसरले

कोझिकोड, ७ ऑगस्ट २०२०: एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. केरळच्या कोळीकोडमध्ये एअर इंडिच्या विमानाला अपघात झाला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचे हे विमान होते. रनवे वरती विमान लँड करत असताना विमान रनवे सोडून पुढे गेल्यामुळे हा अपघात झाला आहे. याबाबत स्पष्टीकरण केरळचे कॅबिनेट मंत्री के राज यांनी दिले आहे.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे हे विमान दुबईवरून केरळमध्ये आले होते. या विमानांमध्ये तब्बल १९१ प्रवासी होते. बोईंग ७३७ प्रकारचे हे विमान करुपूर धावपट्टीवर संध्याकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी लॅंड करत होते. त्यावेळी हे विमान धावपट्टीवरून घसरत पुढे गेले.

हा अपघात होताच घटनास्थळाकडे तातडीने चोवीस रुग्णवाहिका रवाना झाल्या. तसेच अग्निशामक दल देखील बचाव कार्य करण्यासाठी अपघातस्थळी पोहोचले आहे. विमानाचा अपघात झाला आहे परंतु, अपघातांमध्ये विमानाने पेट घेतलेला नाही. विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. या अपघातामध्ये विमानाचा पायलट मृत्युमुखी पडला आहे. इतरही जीवित हानी झाल्याची शक्यता आहे. परंतु, अद्याप कोणतीही माहिती हातामध्ये आलेली नाही.

एअर इंडियाने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार विमानात १७४ प्रवासी होते आणि ६ क्रू मेंबर्स होते, ज्यात दोन पायलट्सचाही समावेश होतो. DGCA ने दिलेल्या माहितीनुसार करीपूर विमानतळाच्या रनवे नंबर १० वर उतरताना हे विमान घसरले आणि याचे दोन तुकडे झाले.

या घटनेवर लगेच राजकिय क्षेत्रातून दखल घेतली जात आसून कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लगेच ट़विट तर शोक व्यक्त केला.

राहुल गांधी….

एआय क्रॅश लँडिंगवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, केरळच्या कोझिकोड येथे दुबईहून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या लँडिंगविषयी ऐकून मला धक्का बसला. प्रवाशांच्या जखमी व जखमींबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. मी प्रार्थना करतो की या प्रवाशांनी या भयंकर परीक्षेतून बचावले. माझे विचार यावेळी क्रू, प्रवासी आणि त्यांचे कुटुंब आणि मित्र यांच्यासमवेत आहेत. ”

अमित शाह….

एनडीआरएफला घटनास्थळावर पोहोचण्याचे निर्देश दिले, असे अमित शहा यांनी सांगितले केरळचे कोझिकोड येथे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या भीषण अपघाताबद्दल जाणून घेताना विव्हळलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. एनडीआरएफला लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणि बचाव कार्यात मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ”

याबाबत प्रशासनाने हेल्पलाईन जाहीर केली आहे.
०५६५४६३९०३/०५४३०९०५७२

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा