लोणी काळभोर, दि. २२ जुलै २०२०: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आज वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे हवेली तालुका सरचिटणीस सरफराज शेख यांनी व ग्रीन फाउंडेशनच्या मागदर्शना खाली लोणी काळभोर रामदरा येथे कडुलिंब, तुळस, ह्या झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करायला हवे, शुद्ध हवा, मुबलक पाणी मिळविण्यासाठी तसेच जमिनीची धूप होऊ नये यासाठी झाडांची मोठी मदत होते. तसेच प्रत्येक झाडाचा औषधासाठी उपयोग होतो. म्हणून बहुपयोगी झाडांची लागवड करायला हवी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका सरचिटणीस म्हणाले.
या वेळी ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सपन्न झाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे