स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण

उस्मानाबाद, १५ ऑगस्ट २०२०: आज १५ ऑगस्ट देशाला स्वातंत्र्य मिळून या वर्षी ७४ वे वर्ष. लॉकडाउनच्या काळात सद्यस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फक्त काही व्यक्तींनी उपस्थित राहून आज ध्वजारोहण केले.

यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उस्मानाबाद येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर, उस्मानाबाद येथे आज मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना. शंकरराव गडाख पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी तेथे खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, जि. प.अध्यक्ष सौ. अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचे सिनेट सदस्य संजय मामा निंबाळकर, आ. कैलास घाडगे पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन, सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा