रस्त्यावरील खड्डे न बुजवल्याने खड्ड्यात केले वृक्षारोपण

पुरंदर, ११ ऑक्टोबर २०२०: पुरंदर व बारामती तालुक्याच्या सीमेवरून जाणाऱ्या सातारा – नगर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी करीत राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष विनय दगडे यांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले आहे. येत्या आठ दिवसांत हे खड्डे बुजवले नाही तर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यानी यावेळी दिला आहे.

पुरंदर तालक्यातील सर्वच ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. पुरंदरच्या पूर्वेकडून जाणाऱ्या सातारा – नगर मार्गावर तर खड्ड्यांच प्रमाण खूपच आहे. या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक असते. अहमदनगरहून राष्ट्रीय महामार्ग चार कडे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. त्यामुळे अनेक वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात. वाहतूक जरी मोठी असली तरी रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे शासन नेहमीच दुर्लक्ष करते आहे. नीरा ते मुर्टी दरम्यानच्या मार्गावर तर अनेक खड्डे पडले आहेत.

हे खड्डे बुजवण्याची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आणि म्हणूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष विनय दगडे यांनी या रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आमदर, खासदार व पालकमंत्र्यांना याबाबत लक्ष घालून रस्ता तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे काही कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी :- राहुल शिंदे

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा