सोलापूर, २ जुलै २०२० : डॉ. मेतन फाउंडेशन , सकाळ ग्रुप आणि राष्ट्रीय महामार्ग असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने काल आषाढी एकादशीचे औचित्य साधून तोगराळी-कंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर वृक्षारोपण आयोजित केले गेले.
या कार्यक्रमात डॉ. मेतन फाउंडेशनतर्फे दीर्घायुष्य असणार्या १०५ उत्तम प्रतीचे वृक्ष मुख्यतः वटवृक्ष आणि काही पिंपळ वृक्ष, अंजीर वृक्ष इत्यादी वृक्षांच्या देणग्या दिल्या आहेत.
यावेळी सुधाकर महाराज इगळे यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संपूर्णसिंह नागपाल, डॉ व्यंकटेश मेतन,संजय कदम,अनिल विपत, पवनकुमार श्रीवास्तव, प्रशांत कुलकर्णी, राजीव गुप्ता व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुधाकर महाराज म्हणाले की , ” वृक्ष लागवडी मुळेच आपले पर्यावरण संतुलीत राहिल ” आमचा हाच प्रयत्न असेल की वृक्ष लागवड करून पृथ्वीला निरोगी आणि आनंदी ठेवणे या कार्याने आम्ही एक प्रकारे निसर्गास मदतच करीत आहोत. हे झाड अनेक पक्ष्यांना आणि प्राण्यांना अन्न आणि निवारा देईल.
यावेळी बोलताना डॉ. मेतन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ व्यंकटेशन मेतन म्हणाले की, ” आम्ही नेहमीच लहान कृती करतो ज्यामुळे त्याचा मोठा परिणाम होतो. आणि आम्ही या महामार्गावर लवकरच असेच कार्यक्रम करीत आहोत.
न्यूज अनकट प्रतिनिधी