बारामती ९ फेब्रुवरी २०२१ : खेळाडूंनी कोणत्याही खेळात प्रावीण्य मिळावा परंतु देशाला सुवर्ण पदक मिळवून देणारच या उदेश्याने प्रत्यन करा,दिखाऊ पणा पेक्षा टिकाऊ बना असा सल्ला भारत श्री विजेते व वर्ल्ड चॅम्पियन बॉडी बिल्डिंग सुवर्णपदक विजेते महेंद्र चव्हाण यांनी दिला आहे.
ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन,अखिल भारतीय खेल महासंघ यांच्या वतीने विविध क्षेत्रातील खेळाडूंचा सत्कार व यशस्वी खेळाडूंचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी 3 वेळा आयर्नमॅन झालेले सतीश ननवरे,अभिनेत्री कल्याणी चौधरी,खेल महासंघाचे समनव्यक युसूफ मलिक,खेल महासंघाचे महाराष्ट्र युनिट हेड आशिष डोईफोडे,प्रशांत भागवत, अप्पसाहेब देवकाते,शुभम इंगवले,ओंकार खुडे,विशाल हडबंर,सोमनाथ भोसले,सत्यम आवाळे,तुषार आवाळे,दादा अहिवळे, कमलेश परदेशी,दीपाली मदने,शिवांजली पवार,अकांक्षा मारकड,आप्पासाहेब मारकड,वैजीनाथ गावडे आदी मान्यवर उपस्तीत होते.सराव,आहार व व्यवसनमुक्त राहिल्यास यश नक्की मिळते असा सल्ला ननवरे यांनी दिला.
मोबाइल,कॉम्पुटर व टीव्ही चा वापर योग्य कामासाठी फक्त काही ठराविक वेळेत करा मैदानी खेळ जास्त खेळा जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर भारताला कोणत्याही खेळात पदक जिंकून द्या अशी मागणी अभिनेत्री कल्याणी चौधरी यांनी दिली. खेळाडूंना मैदान प्राप्त करून देण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी खेल महासंघाच्या वतीने सन्मान करीत असल्याचे आयोजक आशिष डोईफोडे यांनी सांगितले.आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन आनिल सावळेपाटील यांनी मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव