पुण्यातील लहान घरांचा मिळकतकर माफ करा, आमदार रवींद्र धंगेकर

पुणे, २२ जुलै २०२३ : पुणे महापालिका हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकर माफ करावा, अशी मागणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित केली. आमदार सुनील टिंगरे आणि आमदार सुनील कांबळे यांनीही या मागणीला समर्थन दिले. रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला तसेच कनिष्ठ मध्यम वर्ग हे प्रामुख्याने ५०० स्क्वेअर फुटांच्या घरामध्ये राहतात.

शहराची वाढ होत असताना अनेक उपनगरे, लगतची गावे समाविष्ट झाली आहेत. यामध्ये छोट्या मिळकतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना मिळकतकरामधून पूर्ण सूट देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिका हद्दीमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी धंगेकर यांनी केली.

महापालिकेने वापरासाठी व भाड्याने ज्या मिळकती दिलेल्या आहेत. त्यांचा थकीत कर वसूल करण्यासाठी पालिकेकडे कुठली यंत्रणा आहे की नाही? हा प्रश्न आमदार सुनील कांबळे यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात अहवाल मागवून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर दिले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा