गुणवडी ते २९ फाटा रस्त्याची दुर्दशा

बारामती, १४ ऑक्टोबर २०२०: बारामती गुणवडी गाव ते २९ फाटा कुंभारवस्ती नजिक ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहरीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याची पावसामुळे दुरावस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. येथील स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे. दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाणही वाढल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात २९ फाट्याकडे जाणाऱ्या रस्ताची परिस्थिती दयनीय असते. यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गुणवडीकडुन कुंभार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठाले खड्डे पडून त्यामध्ये पाणी साचते आहे. दर वर्षी येथील राहिवाश्यांसामोर हा यक्ष प्रश्न उद्भवतो. ग्रामपंचायतीच्या गटातटाच्या राजकरणावरून रस्त्याच्या कामाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. ग्रामपंचायतीच्या अनेक पंचवार्षिक निवडणुका या रस्त्याने पाहिल्या पण रस्त्याला व स्थानिक रहिवाश्यांना मात्र रस्त्यासाठी झगडावे लागत आहे. प्रत्येक निवडणुकीत उमेदवार यंदा रस्त्याचे काम करणार असे आश्वासन देतात पण परिस्थिती जैसे थे आहे. या रस्त्याच्या काम मंजूर आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे काम थांबले आहे. रस्ता १० फुटांचा असून रस्ता मातीचा आहे. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत.

बऱ्याच ठिकाणी स्थानिक राहिवश्यानी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता वापरास फक्त ५ फूट राहिलेला आहे. रस्त्यात खड्डे आणि चिखल वाहन चालकांना, विद्यार्थ्यांना, स्थानिक लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक दुचाकीस्वार पडून दुखापत झाली आहे. एखादा जीव गेल्यावर ग्रामपंचायत काम करणार का? असा संतप्त सवाल राहिवश्यानी केला. या रस्त्यावर ५० कुटुंबातील लोकांचा वावर आहे. ग्रामपंचायत प्रत्येक वर्षी नागरिकांकडून कर वसूल करतात, मात्र आपले कर्तव्य बजावत नाहीत अशी खंत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा