प्लंबिंग आणि इलेक्ट्रॉनिक सेवा सुरू मात्र याचे स्त्रोत असणारे दुकाने बंद

पुणे: करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाउन सुरू असलं तरी आजपासून काही ठिकाणी काही गोष्टी शिथिल करण्याचा तर काही ठिकाणी लॉकडाउन अधिक कठोररित्या राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे तेलंगणमध्येही लॉकडाउनचा कालावधी ७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर ऑनलाइन जेवण घरोघरी पोहोचवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

परंतु या सर्वांमध्ये सरकारने काही शिथिलता दिली होती. ज्यामध्ये काही छोटे मोठे उद्योग धंद्यांना परवानगी देण्यात आली होती. त्याच बरोबर काही सेवांचा देखील समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये प्लंबिंग, सुतार, इलेक्ट्रिशियन यांसारख्या सेवा सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले. परंतु आता नागरिकांसमोर असा प्रश्न उभा राहिला आहे की या सर्व कामांना लागणारे उपकरणे आणि पार्ट ज्या दुकानांत भेटतात ती सर्व बंद आहेत.

एकीकडे या सेवा चालू केल्या आणि दुसरीकडे या सेवांचा स्त्रोत असणारी हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक दुकाने मात्र बंद आहेत. त्यामुळे तहान लागली पण पाणी नाही अशी गत नागरिकांची झाली आहे. प्लंबिंग आणि इलेक्ट्रॉनिक कामाची संबंधित सर्व साहित्य विकणारी दुकानाच बंद आहे त्यामुळं या समस्या लोक कास सोडविणार हा प्रश्न उभा राहिला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा