वार्षिक पोलीस महासंचालक परिषदेत पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन

पुणे : पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) सुरु असलेल्या तीन दिवसीय वार्षिक पोलिस महासंचालक परिषदेच्या (डीजी कॉन्फरन्स) शनिवारी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले.
आयसर येथील परिषदेमध्ये देशातील सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांसह रिसर्च अॅनलिसीस विंग (रॉ), गुप्तचर विभाग (आयबी), राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांच्या प्रमुखांची उपस्थिती आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर, ‘आयबी’चे प्रमुख अरविंद कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
गृहमंत्री अमित शहा यांनी या परिषदेला मार्गदर्शन केले. तर शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. यावर्षी न्यायवैद्यकीय आणि शास्त्रीय तपास हा परिषदेचा मुख्य विषय आहे.
त्यादृष्टीने परिषदेमध्ये चर्चा केली जात आहे. याबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विविध विषयांवर चर्चा करुन त्यावरील उपाययोजनांबाबतही या परिषदेमध्ये सविस्तर चर्चा केली जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा