नवी दिल्ली, १ जुलै २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे, त्यावर तुमचे मत काय?, असे विचारले यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात जाऊ शकतात. ते देशातील कोणत्याही भागात जाऊ शकतात. ते मणिपूर सोडून सगळीकडे जात आहेत. आमचे म्हणणे आहे, त्यांनी मणिपूरमध्ये जावे. पण ते पुण्यात येत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. ते राजधानी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राशी एक वेगळे नाते आहे. पंतप्रधान मोदींनी कुठे जावे हे आम्ही ठरवत नाही. तर ते पंतप्रधान आणि त्यांचे कार्यालय ठरवते. पंतप्रधान पुण्यात येत आहेत. तर त्यांचे महाराष्ट्रात स्वागतच करतो, असे संजय राऊत म्हणाले.
एक महिन्याआधी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. पंतप्रधानांच्या भाषणानंतर काहीच दिवसात ज्यांच्यावर आरोप केले तेच लोक भाजपसोबत गेले. ज्यांच्यावर मोदींनी आरोप केले तेच सगळे नेते आज मोदींसोबत व्यासपीठावर आहेत. तसेच समोर बसलेले असतील. त्याचा अर्थ तुम्ही लोकांना धमकावून तुमच्यासोबत घेत आहात, अशी टीका राऊत यांनी केली आहे. ज्यांच्यावर आरोप केले तेच नेते आज तुमच्यासोबत असतील.तर तुम्ही लोकांना धमकावत आहात. किंवा तुम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर करत असलेले आरोप खोटे आहेत, असेही राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात येणे ही चांगली गोष्ट आहे. पण शरद पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे की नाही?. हा अराजकीय कार्यक्रम असल्याचे शरद पवार यांचे म्हणणे आहे. तीन महिन्याआधी मी या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे आता त्या कार्यक्रमाला मी हजर राहिलो नाही तर ते योग्य होणार नाही. कारण पंतप्रधानांचा एक प्रोटोकॉल असतो. त्यानुसार निमंत्रकच या कार्यक्रमाला हजर नसेल तर ते बरोबर दिसत नाही, असे पवार साहेबांनी सांगितले आहे. पण लोकांचे असे म्हणणे आहे की सध्या परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे पवारसाहेबांनी या कार्यक्रमाला जाणे योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर