आम्ही लोकशाही वाचवली म्हणून मोदी पंतप्रधान; मल्लिकार्जुन खरगेंचा मराठीतून मोदींवर हल्लाबोल

नांदेड, ११ नोव्हेंबर २०२२ : काल नांदेडमध्ये केलेल्या भाषणात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार हे विचारतात, काँग्रेसने काय केलं? तर आम्ही ७० वर्षांत लोकशाही वाचवली, संविधान वाचवलं. म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले, असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी टीका केली.

काल १० नोव्हेंबर रोजी ‘भारत जोडो यात्रेनिमित्त झालेल्या लोकसभेत अनेक नेत्यांची भाषणं झाली. लोकसभेत असणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे पदाधिकारी अशे अनेक नेते होते. त्यामध्ये राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही भाषणामध्ये मराठीतून जनतेशी संवाद साधला. दरम्यान, याआधीही लोकसभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशी टीका केली होती, की ‘आज जो काही विकास दिसत आहे, तो काँग्रेसनेच केला आहे.

गुरुवारी ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त झालेल्या सभेत खर्गे म्हणाले, जे लोक मोदी, मोदी करणारे असतात. या लोकांना आम्ही इंजिनियर डॉक्टर आणि प्राध्यापक केलं आहे. तरीही मोदी नेहमी विचारतात काँग्रेसने काय केलं? आम्ही संविधान वाचवले नसते, तर तुम्ही पंतप्रधान झाले नसता. मात्र, काँग्रेसला शिव्या दिल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. दरम्यान, दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असं आव्हान मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी केलं होतं. परंतु, सत्तेत येऊन आता नऊ वर्ष झाले. अठरा कोटी रोजगार, पंधरा लाख रुपये, आणि वर्षाला दोन कोटी नोकऱ्या कुठं आहेत? युवकांची ही फसवणूक आहे. मात्र पंतप्रधानांनी ही फक्त जूमलेबाजी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा