PM Modi Security Breach : 150 जणांवर FIR दाखल

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2022: पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला थांबवल्याप्रकरणी फिरोजपूर पोलिस स्टेशन कुलगढ़ी येथे 150 अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाय. दाखल केलेल्या एफआयआरनुसार, डीएसपी सुरेंद्र बन्सल यांच्या म्हणण्यानुसार, 5 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता फिरोजपूर मोगा रोड अज्ञात लोकांनी ब्लॉक केलाय, असा फोन इन्स्पेक्टर बिरबल सिंग यांना आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 283 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा वेळी हा विभाग शमपूर्तीसारखा दिसतो. ज्यामध्ये केवळ दोनशे रुपयांपर्यंत दंड असल्याची चर्चा आहे. यामध्ये दोनशे रुपये दंड भरून आरोपीची सुटका होऊ शकते.

सतलजमध्ये सापडली संशयास्पद बोट

दरम्यान, पंजाबमधील फिरोजपूरच्या सीमा सुरक्षा दलाला सतलज नदीत एक संशयास्पद बोट सापडली आहे. मात्र, ताज्या माहितीनुसार ही बोट इथपर्यंत कशी पोहोचली आणि कोणी आणली याबाबत बीएसएफकडं कोणतीही माहिती नाही. बीओपी टीटी माळजवळ ही बोट सापडल्याचं सांगण्यात येत आहे. वास्तविक, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीही याच भागात असल्यानं बोट सापडणं महत्त्वाचं ठरतं. त्यांचा ताफा घटनास्थळापासून अवघ्या 50 किमी अंतरावर अडकला होता.

सिद्धू यांनी साधला निशाणा

दरम्यान, शुक्रवारी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, जेव्हा पंतप्रधान मोदींना विमानाने जावं लागलं. रस्त्यानं जाण्याचं नियोजन नव्हतं. मग ते कसे गेले? एवढंच नाही तर या प्रकरणात आयबी आणि केंद्रीय एजन्सी जबाबदार नाही का, असा सवालही सिद्धू यांनी केला.

सिद्धू म्हणाले, रॅलीत लोक नव्हते. त्यामुळं ही संपूर्ण योजना आखण्यात आली. रॅलीत 70 हजार खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. मात्र 500 लोकही आले नाहीत. अशा स्थितीत हे सर्व नाटक करण्यात आलं आहे. सिद्धू म्हणाले, भाजप पंजाबला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा