गोल पोस्ट अर्थ उद्योग आज पंतप्रधान मोदी गुजरातला देणार ५,८०० कोटींची दिवाळी भेट, करणार ‘या’ प्रकल्पांचे...

आज पंतप्रधान मोदी गुजरातला देणार ५,८०० कोटींची दिवाळी भेट, करणार ‘या’ प्रकल्पांचे उद्घाटन

गुजरात, ३० ऑक्टोंबर २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी ते गुजरातमधील विविध विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. एवढेच नाही तर पीएम मोदी गुजरातला दिवाळीची खास भेट देणार आहेत. आज पंतप्रधान मोदी रेल्वे, रस्ते, पिण्याचे पाणी आणि सिंचन यासारख्या विविध क्षेत्रातील सुमारे ५,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

या गुजरात दौऱ्यावर पंतप्रधान मोदी आज दुपारी बाराच्या सुमारास ते मेहसाणा येथील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ३१ ऑक्टोबरला म्हणजेच उद्या सरदार पटेल यांची जयंती आहे. यावेळी पंतप्रधान मोदी सकाळी ८ वाजता केवडिया येथे जाऊन ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर पुष्पहार अर्पण करून सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण करतील. त्यानंतर राष्ट्रीय एकता दिन सोहळा साजरा केला जाईल. अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर मोदी ९८ व्या कॉमन फाउंडेशन कोर्सच्या अधिकारी प्रशिक्षणार्थीना संबोधित करतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

शून्य प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

error: Content is protected !!
Exit mobile version