दिल्ली, १९ ऑक्टोबर २०२२ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील ISI या दहशतवादी संघटनेसकडून हा धोका असल्याचे समजल्याने पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
नुकतीच हिमाचल प्रदेश आणि गुजरातची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर मोदी महाराष्ट्राच्या दौ-यावर असणार आहेत.
ISI कडून अधिकृतरित्या धमकी देण्यात आली नसली तरी मोदींच्या जीवाला धोका असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात मिळणा-या सर्व टीप्सनुसार यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. पंतप्रधान मोदी सध्या विविध दौ-यावर असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. मात्र याचे धागे-दोरे शोधून काढण्याचे काम सुरक्षा यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस