फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ‘लिजन ऑफ ऑनर’ ने पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानित

मुंबई, १४ जुलै २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सच्या ‘लीजन ऑफ ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. आतापर्यंत फ्रान्स या देशाने जगातील निवडक नेत्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. फ्रान्सने या नेत्यांना आतापर्यंत सन्मानित केले आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स, किंग चार्ल्स, माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बुट्रोस बुट्रोस-घाली अशी सन्मानित केलेल्या नेत्यांची नावे आहेत.

पंतप्रधान मोदींना इजिप्तने जून २०२३ मध्ये ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ या पुरस्काराने सन्मानित केले. पापुआ न्यू गिनीद्वारे मे २०२३ मध्ये ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’या पुरस्काराने सन्मानित केले. मे २०२३ ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ या पुरस्काराने सन्मानित केले. पलाऊ देशाने मे २०२३ मध्ये ‘अबकल’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

२०२१ मध्ये भूतानचा ड्रुक ग्याल्पो, २०२० मध्ये यूएस सरकारकडून ‘लीजन ऑफ मेरिट’, २०१९ मध्ये बहरीनचा किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स, २०१९ मध्ये मालदीवकडून निशान इज्जुद्दीनचा विशिष्ट नियम, सेंट अँड्र्यूचा ऑर्डर रशियाचा पुरस्कार, पंतप्रधानांना २०१९ मध्ये संयुक्त अरब अमिरातीकडून ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार, २०१८ मध्ये ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार, २०१६ मध्ये अफगाणिस्तानचा स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान आणि ऑर्डर ऑफ अब्दुलअजीझ अल सौद यांनी सन्मानित केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा