पुण्यातील माय-लेकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक; बनले देशाचे भरडधान्य अग्रणीदूत,

6

पुणे, १७ नोव्हेंबर २०२२ : पुणे शहारातील मार्केटयार्डजवळील गंगाधाम परिसरात राहणाऱ्या शर्मिला ओसवाल आणि त्यांचा मुलगा शुभम ओसवाल या माय-लेकराच्या बेसिलिया ऑरगॅनिक्स या भरडधान्याच्या स्टार्टअपची भारत सरकारतर्फे निवड करण्यात आली आहे. त्यांच्या स्टार्टअपची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन त्यांना दिल्लीतील प्रदर्शनात बोलाविण्यात आले. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्टॉलला भेट देऊन भरडधान्यावर ३३ मिनिटे चर्चा करीत त्यांचे कौतुक केले.

दिल्लीत भरलेल्या या पीएमओ किसान संमेलनात देशभरातून कृषी उद्योगावर आधारित तब्बल पंधराशे स्टार्टअप सहभागी झाले होते. यात पुणे शहरातून शर्मिला ओसवाल आणि शुभम ओसवाल या माय-लेकराचे बेसिलिया ऑरगॅनिक्स हे भरडधान्याचे स्टार्टअप होते. आणि याच स्टार्टअपची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या भरडधान्य प्रसारासाठी भारत सरकारतर्फे करण्यात आली आहे. आगामी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पोषक अन्नधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.

शर्मिला या मूळच्या कोकणातील पायनाडच्या. मराठी माध्यमात त्यांचे शालेय शिक्षण झाले. जिद्दीने इंग्लंडला गेल्या. तेथे कृषी कायदे विषयात एलएल.एम. ही पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्या भारतात आल्या, लग्नानंतर त्या पुण्यातच स्थायिक झाल्या. भरडधान्यावर पुणे शहरातील मांगळेवाडी भागात स्टार्टअप सुरू केले.

शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती करणे, भरडधान्य उत्पादन वितरण-विक्री, याबाबत माहिती देणे, शेतकरी महिलांची संघटना उभारणे अशी सामाजिक कामेही सूरू होती. आणि या कामात त्यांचा २२ वर्षीय मुलगा शुभम हादेखील विदेशातून शिकून आलेला असून तोही पूर्णपणे आईला मदत करत आसतो.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा