पुण्याचे दवाखाने ‘सलाइन’वर! महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ६३५ पदे रिक्त

पुणे महापालिकेच्या दवाखान्यांची अवस्था बिकट झाली असून, अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य सेवा ‘सलाइन’वर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या रुग्णालये, दवाखाने आणि प्रसूतिगृहांमध्ये वर्ग १ ते ४ मधील तब्बल ६३५ पदे रिक्त आहेत. यामुळे रोज हजारो रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

एकूण १,७८३ मंजूर पदांपैकी केवळ १,१६० कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. यातही सर्वाधिक फटका डॉक्टरांच्या सेवेला बसला आहे. डॉक्टरांच्या १४५ मंजूर पदांपैकी १०६ पदे रिक्त आहेत, तर केवळ ३९ डॉक्टरांवर संपूर्ण शहराच्या आरोग्यसेवेची जबाबदारी आहे. आरोग्य विभागप्रमुख डॉ. निना बोराडे यांनी रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले असले, तरी सद्यस्थिती गंभीर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे