गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पीएमपीच्या ताफ्यात २२०० नव्या बस – पार्किंगसाठी जागेचा शोध सुरू

पीएमपीच्या ताफ्यात २२०० नव्या बस – पार्किंगसाठी जागेचा शोध सुरू

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) लवकरच आपल्या ताफ्यात तब्बल २,२०० नवीन बस दाखल करणार आहे. या निर्णयामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र या बसच्या पार्किंगसाठी आणि डेपोसाठी जागा अपुरी असल्याने पीएमपी प्रशासनाने जागेच्या शोधाला सुरुवात केली आहे.

सध्या उपलब्ध जागा मर्यादित असल्याने अनेकदा बस रस्त्यावर पार्क कराव्या लागतात. ही अडचण दूर करण्यासाठी पीएमपीने पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएकडे ५ जागांची मागणी केली असून नुकतीच पीएमपी अध्यक्षांनी या जागांची पाहणी केली. विशेष म्हणजे, या सर्व नवीन बस स्वमालकीच्या असणार आहेत, ज्यामुळे प्रवासी सेवेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version