गोल पोस्ट महाराष्ट्र पीएमपी अध्यक्षांचा मोठा निर्णय, बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला मिळणार शंभर रुपये...

पीएमपी अध्यक्षांचा मोठा निर्णय, बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला मिळणार शंभर रुपये बक्षीस

पुणे, १२ जुलै २०२३ : बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशांना आता पीएमपीकडून शंभर रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी आणि चालक-वाहकांमध्ये सुधारणा व्हावी, याकरिता पीएमपीचे नवीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह हा नवीन उपक्रम राबवणार आहेत.

पीएमपी अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार स्वीकारताच गेले दोन-तीन दिवस पीएमपीच्या सेवेने प्रत्यक्ष प्रवास करुन पाहणी केली. या दरम्यान सिंह यांना अनेक चालक बेशिस्तपणे काम करत असल्याचे पाहायला मिळले. त्यामुळे नवीन अध्यक्षांनी हा उपक्रम हाती घेतला असून त्या अंतर्गत बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशांना शंभर रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

असे होणार बक्षिसाचे नियोजन चालकाने केलेल्या बेशिस्तपणाबद्दल त्यांच्या पगारातून दंडाची रक्कम वजा करण्यात येणार आहे. यामधील रक्कम तक्रारदार प्रवाशाला बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे, असे पीएमपीचे नवीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version