पुण्यात पीएमपीएमएल’ बसच्या ५८४ फेऱ्या झाल्या रद्द

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता ‘पीएमपीएमएल’ बसच्या ५८४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीतून होणारा संसर्ग टाळण्यासाठी प्रसासनाने हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता दर १० मिनिटांऐवजी आता २० मिनिटानी बस स्टॉपवर बस येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएल बसच्या दररोज १८०० हुन अधिक फेऱ्या होतात. मात्र बस वाहतुकीच्या माध्यमातून ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी ही संख्या एक हजारच्या आत आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. आज बसच्या ५८४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पहिल्या २४ तासात प्रवासी संख्या १२ लाखांवरुन ९ लाखांवर आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा