लोणी काळभोर दि. १५ ऑगस्ट २०२० : तब्बल पाच महिन्यापासून लॉक डाऊन मुळे बंद असलेले पीएमपीची चाके पुढील आठवड्यात पुन्हा धावणार आहेत. शहरात मर्यादित स्वरूपात बस सेवा सुरू करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी संमती दर्शवली आहे मात्र हा निर्णय स्थानिक पातळीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि प्रशासनाने घ्यावा अशा सूचना पवार यांनी केल्या असल्याची माहिती आहे.
दरम्यान याबाबत येत्या सोमवारी किंवा मंगळवारी ही बैठक होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. राज्य शासनाने २३ मार्च रोजी राज्यात लॉकडाऊन जाहीर केले होते त्यानंतर पीएमपीचे प्रवासी संचालन पूर्णपणे बंद करण्यात आले होते.
त्यानंतर काही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा देण्यात येत होती नंतर परराज्यातील मजुरांसाठी काही ठराविक सेवा देण्यात आली तर आता पुणे स्टेशन आणि लोहगाव विमानतळावर सेवा काही प्रमाणात सुरू आहे. त्याच वेळी शहरात सर्व खासगी तसेच शासकीय कार्यालय सुरू झाली असून व्यावसायिक व्यवस्थापन ही सुरू झालेले आहेत मात्र अद्याप पीएमपीची सेवा सुरू नसल्याने या व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मोठी गैरसोय होत आहे.
त्यामुळे मर्यादित प्रवास आणी सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करून पीएमपी सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली होती याबाबत चर्चा करण्यासाठी पुण्यात आढावा बैठकीसाठी आलेले उपमुख्यमंत्री पवार यांनी पीएमपी तसेच महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली असल्याची माहिती आहे.
बैठकीची प्रक्रिया सुरू झाली असून बस सेवा सुरू नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे त्यामुळे बस सेवा मर्यादित स्वरूपात का होईना सुरू करावी अशी पवार यांनी सहमती दर्शवली आहे.
तसेच स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी तसेच सेवा सुरू करणे आणि संचालक किती असावी यासाठी दोन्ही महापालिका प्रशासनाने निर्णय घेऊन सात दिवसाच्या आत याबाबत निर्णय घ्यावा अशा सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत केले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पी एम पी ल पुणेकरांच्या सेवेत रूजू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान मागील ५ महिन्यात पीएमपीला संचालन बंद असल्याने सुमारे अडीच कोटीचा तोटा सहन करावा लागला आहे. तर पीएमपीच्या ताफ्यात सुमारे १० हजार कर्मचारी असून त्यातील चार हजार कर्मचारी पालिकेकडे कोरोनाच्या कामासाठी वर्ग करण्यात आले आहेत. तर २००० हजार कर्मचारी रोजंदारीवर असून त्यांना काम नसल्याने पीएमपीने विनावेतन ठेवले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे











































