इंदापूर, दि.७ मे २०२०: बावडा पोलीस क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध भागातून अवैद्य दारू विक्री करणाऱ्या २५ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजीज जाधव यांनी दिली.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कायदेशीर असणारी दारू दुकाने बंद केल्याने, अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली होती. इतकेच नव्हे तर बनावट मद्य तसेच हातभट्टी यांचे प्रमाणही लक्षणीय वाढले होते.
या पार्श्वभूमीवर येथील पोलिसांनी धाडसत्र सुरु करुन कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर एकीकडे, पोलीस ठराविक धंदेवाल्यांना लक्ष करीत असून अनेकांना पाठबळ देत आहेत, त्यामुळे पोलिस खात्याने कारवाई करताना पक्षपाती भूमिका घेऊ नये, अशी उघड चर्चा गावात ऐकावयास मिळत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे