कोरोनाची भीती पसरवणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई

श्रीगोंदा.१६.मे.२०२०: दररोज पुणे येथे ये – जा करणार्‍या काष्टीतील व्यक्तीला गावातील कोरोना ग्रामसुरक्षा समितीच्या सदस्यांनी घरात थांबण्याचे सांगितले असता याचा राग आल्याने मी पुन्हा पुण्याला जाऊन तेथून कोरोना संक्रमित दहा लोकांना घेवून येणार आणि गावात सोडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढवणार, माझे कोणीही काही करु शकत नाही अशी धमकी देणार्‍या गावातील मुन्ना बागवान यांच्या विरोधात गुरुवारी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात ग्रामसुरक्षा समितीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील काष्टी गावातील मुन्ना बागवान हा तरुण दररोज काष्टी ते पुणे ये – जा करतो म्हणून भोवताली राहणार्‍या व्यक्तीनी याची तक्रार ग्रामसुरक्षा समितीकडे केली याची दखल घेऊन काही सदस्यांनी बागवान यांना बाहेर न जाण्याचा सल्ला देऊन तंबी दिली. परंतू तो काही कोणाचे ऐकत नाही उलट बागवान याने दि.१३ रोजी रात्री १० वाजता सल्ला देणार्‍या सदस्यांना फोन करुन धमकी दिली. मी तर जाणार आहे. पण पुण्याहून काष्टी गावात दहा कोरोनाचे लोक आणून सोडणार आणि संपूर्ण गावात कोरोनाचे थैमान घालणार असे सुनावले.

मग सदस्यांनी हि माहिती ग्रामपंचायतीला देवून दि.१४ रोजी मुन्ना बागवान यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असुन पुढील तपास पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. काष्टी हे गाव पुणे जिल्ह्याच्या सिमेवर आहे. येथून नगर- दौंडरोड वरुन तसेच काष्टी- तांदळी इनगाव येथे सर्वत्र वाहतुक मोठ्या प्रमाणात होते. पुणे जिल्हा रेड झोनमध्ये असल्यामुळे येथील नदीवरील पुलावर पोलिसांनी कडक पहारा देऊन उपाययोजना केल्या आहेत. परंतू लोक मात्र कोणालाही जुमानत नाही. यासाठी पोलिसांनी त्यांना आणखी शिस्त लावण्याची गरज आहे. धमकी देणार्‍या बागवानवर पोलिसांनी कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांन केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा