कर्नलवाडी येथे बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई…

पुरंदर, २७ सप्टेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी कारवाई केली असून, बैलगाडी शर्यत बनवणारे धनंजय बाबुराव दगडे आणि आदित्य हेमंत काकडे यांच्या बरोबरच बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांसह आकार व्यक्तींवर जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल दिनांक २६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे यांना मिळालेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील वाघजाई पठारावर शर्यती भरवण्यात आल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, सहाय्यक फौजदार गायकवाड, पोलीस नाईक राजेंद्र भापकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव, होमगार्ड गायकवाड हे खाजगी वाहनानं या पठारावर गेले असता काही लोक तिथं जमलेले दिसले.

यावेळी काही वाहनांमधून बैलगाडा व बैल जोडी भरून वाहनं उभी होती. त्याचबरोबर काही लोक गड्यास जुपलेले बैल पळण्याच्या तयारीत असल्याचं दिसलं. पोलीस आल्याच पाहताच काही लोकांनी आपल्या बैलगाडासह तेथून पोबारा केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून दोन वाहनं पकडली यामध्ये पिकप नंबर एमएच ४२ एम ६९८६ चे मालक अधिक आनंदराव चव्हाण, दुसरी पिकापगाडी एमएच १२ एफ ५५४० चे मालक बापूराव लक्ष्मण लकडे यांना पकडलं. त्यापैकी एका व्यक्तीकडं त्याचं नाव पत्ता याबाबत विचारना केली असता त्यानं तिथं हजर असणाऱ्या व पळून गेलेल्या लोकांची नावं व राहण्याच्या ठिकाणांना बाबत माहिती दिली.

यानुसार पोलिसांनी १)धनंजय बाबुराव दगडे रा.नीरा.ता. पुरंदर, २) हेमंत आदित्य काकडे रा. निंबुत ता.बारामती. यांनी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केल्याबाबत तर या शर्यती मध्ये सहभाग घेतल्याबद्दल तयार १)आय्याज हबीब सय्यद (३३) रा.नीरा त.पुरंदर. २) राहुल सुधाकर खलाटे (३१)रा.लाटे ता.बारामती व त्यांच्याबरोबर असलेले व पळून गेलेले १)प्रवीण बाळासाहेब पोकळे रा.नीरा,ता.बारामती,२) रामा मदने र.नीरा,त.पुरंदर.३) अमर जाधव रा. निंबुत,ता.बारामती. ४ )संदीप निगडे रा. गुळूंचे ता. पुरंदर ५ ) सत्तरभाई सय्यद रा. नीरा ता. पुरंदर, ६)अधिक आनंदराव चव्हाण रा कोऱ्हाळे ता. बारामती,७) बाबुराव लक्ष्मण लकडे रा. निंबुत ता. बारामती यांच्यावर स्वतःचे मौजमजेसाठी निर्दयपणे बैलांना बैलगाड्यास जूपून पठारावर पळवण्याचा प्रयत्न करून, माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी, तसेच प्राण्यांना क्रूरतेनं वागण्यास प्रतिबंधक कायदा १९६१ चे उलंघन केल्या प्रकरणी, तसेच भादवि कलम १८८, मुंबई पोलीस कायदा ११९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबतची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव यांनी दिली आहे. याबाबतची तक्रार काल रात्री उशिरा दखल करण्यात आली. याबाबतचा आधिकचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या सूचनेनुसार पोलीस उप निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र भापकर करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा