बीड जिल्ह्यात पोलीसाची हातभट्टी विरोधात धडक मोहिम

बीड, दि.३०एप्रिल २०२० : कोरोनामुळे सगळीकडे दारूबंदी असल्याने हातभट्टी तयार करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. असे असताना तलवाडा पोलीस सहायक पोलीस निरीक्षक ऊणवने यांनी तलवाडा, राजापूर, बग्गेवाडी परिसरात हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

गेल्या दोन महिन्यापासुन कोरोनामुळे शासनाने बार, देशी विदेशी दारू दुकाने बंद केल्यांने अवैध दारू विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झालेली असताना तलवाडा, राजापुर, बग्गेवाडी शिवारात मोठ मोठी हातभट्टीचे अड्डे निर्माण झाले होते. या दारूला बाहेरूनही मागणी वाढू लागली होती. त्यामुळे तळीरामांनी हातभट्टीकडे मोर्चा वळवलेल्यांने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

त्यामुळे हातभट्टीचे विविध ठिकांणी तयार झालेले अड्डे तलवाडा पोलिसांनी शोधून काढत गेल्या आठ दिवसापासुन तलवाडा, राजापुर, व मंगळवार रोजी स.पो.नी.ऊणवने यांच्या मार्गदर्शनाखाली.ए.एस.आय.माने, राऊत, गायकवाड यांनी बग्गेवाडी शिवारात शेतात तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणी हातभट्टी व हातभट्टीसाठी लागणारे ५०० लिटर रसायन उद्धवस्त करत मोठी कारवाई केल्याने हातभट्टी निर्माण करणारे सैरावैरा पळू लागले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाल्याने हातभट्टी चालकात तलवाडा परिसरात पोलिसांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हातभट्टी विरोधात विवीध ठिकांनी केलेल्या कारवाईबद्दल सहायक पोलिस निरीक्षक ऊणवने, ए.एस.आय.माने, राऊत, गायकवाड आदींचे नागरिकाकडूंन पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा