गोल पोस्ट गुन्हा जेजुरी येथे तरुणांच्या खून प्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी पकडले

जेजुरी येथे तरुणांच्या खून प्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी पकडले

पुरंदर, २८ डिसेंबर २०२०: जेजुरी येथे बार मध्ये झालेल्या वादातून तरुणांचा खून करून त्याचे प्रेत होळकर तलावात फेकून फरार झालेल्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.

या प्रकरणी माहिती अशी की, शुक्रवार दि २५ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास किरकोळ बाचाबाचीतून प्रसाद मल्हार दळवी रा. जेजुरी या तरुणांचा अमर घोरपडे व निरंजन पवार या दोघांनी होळकर तलावाच्या काठावर डोक्यात दगड घालून खून केला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी या आरोपींनी प्रसाद दळवी यांचे प्रेत होळकर तलावात फेकून देऊन हे आरोपी फरार झाले होतें.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी या तरुणाचे प्रेत पाण्या बाहेर काढून तातडीने तपास करून दोघे आरोपी निष्पन्न करून पुरावे मिळविले होते. आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करून शोध सुरू केला होता. दि. २६ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने निरंजन पवार याला सासवड जवळ, तर दि २७ रोजी अमर घोरपडे याला इंदापूर येथे ताब्यात घेतले.

जेजुरी पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास करून या खून प्रकरणी आरोपीना ताब्यात घेतले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version