पोलीस-पत्रकार-सामाजिक कार्यकर्त्यांनी हरविलेल्या मुलास लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले..!

लोणी काळभोर, दि: १४ ऑक्टोबर २०२०: कदम-वाकवस्ती पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ कवडीपाट टोलनाका येथे घरातून रुसून आलेला अंदाजे १२ वर्षाचा एक मुलगा पोलीस हवालदार मुकुंद रणमोडे बक्कल नंबर ११७७,आणि पोलीस वार्डन सुशांत वरळीकर यांना सकाळी ९ च्या दरम्यान टोलनाका येथे आढळून आला होता. त्यांनी त्यामुलास विश्वासात घेऊन मायेने त्या मुलाची चौकशी केली.

तसेच असे निदर्शनास आले की हा मुलगा घरचे लोक अभ्यास कर म्हणून सतत रागवत असतात याचा राग मनात धरून तो मुलगा फुरसुंगी {कामठे-मळा} येथे राहात असलेल्या आपल्या घरातून रागाच्या भरात बाहेर पडला होता.

पोलीस-पत्रकार-सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या हरविलेल्या मुलास लोणी काळभोर स्टेशनमध्ये घेऊन गेले व लोणी काळभोर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांना घटनेची सविस्तर माहिती दिली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्या-मुलाच्या नातलगांचा योग्य तपास-चौकशी करून त्या मुलास त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी आपल्या कर्मचारी वर्गाचे आणि स्थानिक पत्रकार-सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या सत्कार्याचे कौतुक-अभिनंदन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा