बारामती, दि. ३ जुलै २०२० : बारामती येथील रंजना वणवे या महिलेवर बारामती तालुका पोलीस स्टेशन मध्ये देखील गुन्हे दाखल आहेत या टोळीने पुण्यात देखील गुन्हे केल्याचे उघडकीस आल्यावर त्यांच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.या गुन्ह्यामध्ये चार आरोपी अटकेत असून चौघे फरार आहेत. एक पोलीस कर्मचारी देखील सामील आहे. पोलीस कर्मचाऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.
बारामतीच्या मुख्य सूत्रधार रंजना वणवे या महिलेसह सात जणांवर मोक्का अंतर्गत खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली आहे. या आरोपींपैकी चार जण अटकेत असून चार आरोपी अद्याप फरार आहेत. यांनी हडपसर येथील एका डॉक्टरांकडून गर्भलिंगनिदान करत आहे. असा खोटा बनाव करून डॉक्टरला धमकावत त्यांच्याकडून सात लाख रुपये खंडणी उकळली होती. यामध्ये एक पोलीस कर्मचाऱ्याचा देखील सहभाग आहे. तर या टोळीची मुख्य सूत्रधार महिला रंजना वणवे, सागर राऊत, महेश पवार, किरण माकर, कैलास अवचिते, प्रदीप फासगे, आरती चव्हाण, या आठ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख राजेंद्र मोहिते. यांनी न्यायालयात दिली आहे.
यापूर्वी बार्शी येथील एका डॉक्टरला खंडणी मागितल्या प्रकरणी देखील रंजना वणवे हिच्यावर बार्शी येथे मोक्काअंतर्ग कारवाई झाल्याची माहिती आहे.तरी देखील अशाच प्रकारे संघटित गुन्हेगारी कारवाया करत असल्याने अप्पर पोलीस उप-आयुक्त अशोक मोराळे यांनी मोक्काच्या कारवाई ला मंजुरी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव