साताऱ्यातील हिंसाचारग्रस्त गावावर पोलिसांची पाळत, इंटरनेट सेवा अजूनही बंद

पुणे, १३ सप्टेंबर २०२३ : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात, सोशल मीडिया पोस्टवरून उसळलेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस गावातील कायदा व सुव्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. हिंसाचारानंतर बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा बुधवारी रात्रीपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

पुसेसावळी गावात रविवारी रात्री सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून दोन गटात हाणामारी झाली. दंगलखोरांनी काही घरे आणि वाहनांना आग लावल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गावातील परिस्थिती अजूनही नियंत्रणात असून तेथे पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

हिंसाचारानंतर सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी म्हणाले की, बुधवारी रात्रीपर्यंत ती पूर्ववत होण्याची शक्यता आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १९ जणांना अटक करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा