पाटणा, बिहार १३ जुलै २०२३ : बिहारमधील शिक्षकांच्या नियुक्तीवरून भाजपच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. पाटणा येथे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी गंभीर जखमी झालेले भाजप नेते विजय कुमार सिंह याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती भाजप खासदार सुशील मोदी यांनी दिली आहे. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पाटणा येथील डाकबंगला चौराह येथे भाजप कार्यकर्ते राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. कार्यकत्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या मारा केला. तसेच अश्रूधुराचा कांड्याही फोडल्या. यावेळी झालेल्या लाठीमारात विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटले आहे की, पाटण्यात भाजप कार्यकर्त्यांवर झालेला लाठीमार हा राज्य सरकारच्या अपयशाचा आणि अकार्यक्षमतेचा परिणाम आहे. बिहारमधील महागठबंधन सरकार भ्रष्टाचाराच्या संरक्षणासाठी लोकशाहीवर हल्ला करत आहेत. असे त्यांनी म्हणले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर