गोल पोस्ट गुन्हा ढोकराई फाटा येथे जुगार अड्यावर पोलिसांचा छापा

ढोकराई फाटा येथे जुगार अड्यावर पोलिसांचा छापा

श्रीगोंदा, दि. २२ जून २०२०: श्रीगोंदा तालुक्यातील नगर दौंड महामार्गावरील ढोकराई फाटा या ठिकाणी सुरु असलेल्या जुगार आड्यावर छापा मारून पोलिसांनी काल दिनांक २१ रोजी कारवाई केली.

या कारवाई मध्ये पोलिस पथकाने ३२ हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे. त्या सोबतच १ लाख ४७ हजारांचा मुदेमाल हस्तगत केला आहे.

या बाबत पोलिस सुत्रानुसार समजलेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील नगर दौंड महामार्गावर असलेल्या ढोकराई फाटा या ठिकाणी बेकायदेशीर जुगार अड्डा चालल्याची माहिती पोलिस पथकाला गुप्त माहिती दलाकडून मिळाली , या नंतर पोलिस विभागाने पथक तयार करून छापा मारला. या मध्ये पोलिसांनी ३२ हजारची रोकड आणि १ लाख ४७ हजारांचा एकुण मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील कारवाई श्रीगोंदा पोलिस करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version