शिर्सूफळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिर्सूफळ (ता. बारामती), १ फेब्रुवरी २०२१: येथील जुगार अड्ड्यावर बारामती तालुका पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी सात जुगाऱयांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोपट चंद्रकांत सावंत, राहूल रमेश आटोळे, सतीश बापू हिवरकर, गणेश नानासो आटोळे, प्रवीण यशवंत भारती, राहूल नानासो शिंदे व प्रवीण अरविंद शिंदे (सर्व रा. शिर्सूफळ, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिस कर्मचारी नंदू जाधव यांनी फिर्याद दिली. दि.३१ जानेवारी रोजी पोलिस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक निरीक्षक योगेश लंगुटे व सहकाऱयांनी ही कारवाई केली. शिर्सूफळमध्ये प्रवीण शिंदे हा काही लोकांसोबत पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. सहाजणांना ताब्यात घेण्यात आले. तर प्रवीण शिंदे हा पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला.

घटनास्थळावरून पोलिसांनी ४३३० रुपयांची रोख रक्कम, मोटारसायकली असा सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा