सातारा २९ ऑक्टोबर २०२३ : साताऱ्यात कास-रोड वरील रिसॉर्टवर सातारा तालुका पोलीसांनी छापा टाकून, रिसॉर्टमधील हॉलमध्ये डान्स करणा-या बारबालांसहित १८ जणांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईत रिसाॅर्ट मालक, मॅनेजर, वेटर्स आणि इतर १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यावेळी ८२ हजार ६९८ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पेट्री- कास (ता. जि. सातारा) येथील राज कास हिल-रिसॉर्टमध्ये काही तरुणांसमोर ६ बारबालांना संगिताच्या तालावर नाचवले जात होते. उत्तान कपड्यात बिभत्स हावभाव आणि अंगविक्षेप करत नृत्य करण्यात येत असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी जावून सातारा पोलीसांनी छापा टाकला. तेंव्हा पोलिसांना सदर ठिकाणी बारबालांचा प्रकार आढळून आला. सदर बारबालांवर गिऱ्हाईक नोटा उडवित होते.
पोलिसांचा छापा पडताच राज कास हिल रिसॉर्टचे मालक, मॅनेजर व वेटर्स सदर ठिकाणावरून पळुन गेले. हाॅलमध्ये बारबाला सोबत डान्स करीत असलेल्या इसमांना पोलीसांनी जागीच ताब्यात घेतले. या कारवाईत मोबाईल हॅण्डसेट, साऊंड सिस्टीम व डिस्को लाईट जप्त करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. दळवी करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले