चोपडा, जळगाव २५ नोव्हेंबर २०२३ : चोपडा ग्रामीण पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे, तालुक्यातील उत्तमनगर येथील रवि पावरा याच्या तुरी मध्ये लावलेल्या गांजाच्या शेतीवर कारवाई केली. पोलीसांनी शेतात धाड टाकून ७९५ किलो ओला गांजा जप्त केला. याची बाजारभावा प्रमाणे किंमत तब्बल ३१ लाख ८० हजार रूपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
चोपडा ग्रामीण पोलीसांनी शेतात लावलेली गांज्याची शेती उधळून लावली आहे. कारवाई दरम्यान पोलीसांनी ७९५ किलोग्रॅम असा तब्बल दोन ट्रॅक्टर ओला गांजा जप्त केला. हि कारवाई दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सदर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कमलाकर कावेरी या करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनीधी : आत्माराम पाटील