धाराशिवच्या कळंब तालुक्यात मक्याच्या पिकात लावलेला तब्बल साठ लाखांचा गांजा पोलिसांकडून जप्त

कळंब, धाराशिव ६ नोव्हेंबर २०२३ : झटपट श्रीमंत होण्यासाठी माणुस कुठल्या स्तराला जावुन मोठी जोखीम घेतो, याच ज्वलंत उदाहरण म्हणजे कळंब पोलीसांनी केलेली कारवाई. कळंब पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार, कळंब तालुक्यातील इटकुर येथे एका इसमाने त्याच्या अडीच एकर शेतातील ४ गुंटे शेतात गांजाची लागवड केली आहे. या माहीची खातरजमा झाल्यावर पोलीसांनी छापा टाकून हि कारवाई केली.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनित, उप विभागीय पोलीस अधिकारी एम रमेश यांच्या मार्गदर्शनखाली, कळंब तहसिल कार्यालयाचे सक्षम अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेवुन शासकिय पंचासह माहितीच्या ठिकाणी छापा मारला. यावेळी ईटकर शिवारात, शेत गट नं १२०१ मध्ये शेतकरी दशरथ संपती काळे, राहणार ईटकर याने मक्याच्या शेतात अवैध गांज्यांची झाडे लावुन त्याचे संवर्धन करीत असल्याचे टीमच्या निदर्शनास आले. त्याच्या शेतातुन एकुण ५०० किलो ५०० ग्रॅम वजनाची ओलसर गांज्याची झाडे, ज्याची एकुण किंमत ६०,०६,००० (साठ लाख, सहा हजार रुपये) रुपये होते, इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर शेतकरी याचे विरुद्ध NDPS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक नवनित कावत, उप विभागीय पोलीस अधिकारी एम रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे, पोहेकॉ सुनिल कोळेकर, पोहेकॉ बालासाहेब तांबडे, चालक पोहेकॉ पांडुरंग माने, पोना दत्तात्रय शिंदे, पोना अजिज शेख, पोना शिवाजी राऊत, मपोना सविता कांबळे, पोकॉ भरत गायकवाड, पोकों करीम शेख, पोकॉ वैजिनाथ मोहिते, पोकॉ फलचंद मुंडे, पोकॉ रंजित लांडगे, मपोकॉ रोहिनी चव्हाण, चालक पोकॉ परमेश्वरं मंगनाळे यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा