चोरटी दारू वाहतुक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले

4

औरंगाबाद, दि.२८ मे २०२० : अहमदनगर येथून गंगापूर मार्गे शहरात लपून छपून अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एका कारसह १ लाख ७८ हजार २०० रुपयांची देशी दारू स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे.

विनोद मोहतले (वय ३२ ) व अजय वाहुळ (वय २५ दोघे रा. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी की, अहमदनगरहुन गंगापूर मार्गे शहरात अवैधरित्या देशी दारुची वाहतूक होणार आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने नेवरगाव-वाहेगाव रोडवर मनसे चौक येथे सापळा रचला. नमूद ठिकाणी आलेल्या एका कारमध्ये ट्रॅव्हलच्या बॅगेत ११८८ देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी दोन आरोपींसह ५ लाख ५० हजार रुपये किमतीची एक कार क्रमांक एम एच- २०, डिव्ही ५५७८) व १ लाख ७८ हजार २०० रुपयांची देशी दारू असा एकूण ७ लाख २८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा