शेतात गांजा लावल्या प्रकरणी सोनारी येथील शेतकऱ्यावर पोलिसांची कारवाई

4

पुरंदर, २१ जानेवारी २०२१: पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथे एका शेतकर्‍याने शेतात गांज्याच्या झाडांची लागवड केल्याप्रकरणी सासवड पोलिसांनी कारवाई केली आहे. शेतकऱ्याने अंजिराच्या बागेत गांज्याच्या झाडांची लागवड केली होती. ही झाडे आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोनोरी येथे राहणारे शेतकरी छगन तात्याबा आढागळे यांच्या अंजीराच्या शेतामध्ये गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यानंतर पोलिसांनी यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांना तिथे सुमारे एक लाख किमतीची गांज्याची झाडे आढळली. याबाबत सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दगडू दुरांदे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी नामे छगन तात्याबा आढागळे राजाणार सोनोरी, ता. पुरंदर जि पुणे याने सोनोरी गावच्या हद्दीतील त्याचे स्वतःचे मालकीचे जागेमध्ये अंजिराच्या बागेमध्ये अंतर्गत पिकांमध्ये गांजाची ३५ ते ४० झाडे लावली आहेत. ज्याची किंमत रुपये १ ११००० असून बेकायदा लावून तिची राखण करून विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगली असल्याचे मिळून आले आहे. याबाबत पोलिसांनी एन.डी. पी.एस. कायदा कलम १९८५ चे कलम १०(ब) व २२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचा अधिकचा तपास पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा