कदमवाकवस्ती येथे पोलिसांची लॉज व्यवसायीकावर कारवाई

कदमवाकवस्ती, दि. १० मे २०२०: संपुर्ण महाराष्ट्र मध्ये कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर दीड ते दोन महिन्यापासून सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत व असे असताना हवेली तालुक्यातील कदम वाकवस्ती येथील एक लॉज चालू असल्याचे लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना गोपनीय माहिती मिळाली.

दि. ९ मे रोजी दुपारी २:३० वाजता लोणी काळभोर पुणे शोध पथकाने तेथे जाऊन धाड टाकली असता लॉज वर एक जोडपे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व याठिकाणी एक नोंद रजिस्टर मिळाले व कलम १८८,२६९, प्रमाणे लॉज मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, यांच्या पथकाने केली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशन करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी -ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा