जयपूर : जयपूरचे आयपीएस अधिकारी राहुल प्रकाश यांना पदोन्नती मिळाली. परंतु त्यांनी आपला सन्मान करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची निवड केली. आणि त्यांच्या हस्ते त्यांनी आपल्या पोशाखावर स्टार लावून घेतले. त्यामुळे सामान्य माणसांबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर या घटनेमुळे दिसून आला. ही अभिमानस्पद गोष्ट समोर आली आहे.
पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येकांची आनंद साजरा करण्याची पद्धव वेगळी असते. आयुष्यातील हा महत्वाचा क्षण कुटुंबीयांसोबत किंवा मित्रांसोबत साजरा करण्याचा अनेकांचा कल असतो. परंतु राहुल प्रकाश यांनी आपला सन्मान करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची निवड केली. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
पदोन्नती झाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्दीवर स्टार लावून घेण्याची सर्वसाधारण पद्धत असते. मात्र, राहुल प्रकाश यांनी वाहतूक नियंत्रण कक्षातील सफाई कर्मचाऱ्यांची यासाठी निवड केली. तसेच त्यांनी आपला आनंद कनिष्ठ कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला. राहुल प्रकाश यांची डीसीपी पदावरून पोलीस उपमहानिरीक्षकपदी (वाहतूक) निवड झाली आहे. राहुल प्रकाश यांचा सफाई कर्मचाऱ्यांसोबतचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.










































