पोलीसांच्या सतर्कतेमुळे टोळी युद्ध रोखले

सोलापूर, दि. १ जुलै २०२०: सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गणपती अकोले ता. माढा येथील दोन गटात हत्यारानिशी होणारी मारामारी टेंभुर्णी पोलीसांचा प्रसंगावधानाने टळली. या प्रकरणी २० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांचाकडून धारदार हत्यारांसह आठ मोटारसायकली जप्त केल्या. ही घटना दि. २८ रोजी टेंभुर्णी येथील बस स्थानक आवारात घडली. पोलीसांचा सतर्कतेमुळे मोठा अनर्थ फिल्मी स्टाईलने घडलेल्या घटनेमुळे टेंभुर्णी पोलीसांचे कौतुक होत आहे.

गणपती अकोले ता. माढा या गावातील एकमेकांच्या वर्चस्वासाठी एकमेकांना मारहाण करण्यासाठी येथील स्वाभिमानी युथ मंच व एस. पी. ग्रुप या दोन गटात हत्यारानिशी हाणामारी होणार असल्याची खबर टेंभुर्णी पोलीसांना मिळाली होती.

जबरी मारहाण करण्याचा उद्देशाने घातक लोंखडी कोयते, लोखंडी पाटा, लाकडी दांडे, बांबू व सायकल चैन, लोखंडी कंची अशा हत्यारानिशी २० जण टेंभुर्णी बस स्थानक आवारात दबा धरून बसल्याची माहीत मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितोळे, भोसले, पोहेकॉ. लोंढे, बनसोडे, चालक मारकड, पोना. घोळवे यांनी आठ मोटारसायकल स्वरांना फिल्मी स्टाईलने गराडा घालून त्यांचाकडून हत्यारे हिसकावून घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. ओंकार कायले रा. शेडशिंगे ता. माढा, सत्यवान हांडे, बळवंत हांडे, अतुल बनसोडे, आकाश नवगिरे, सनी बनसोडे, संतोष बनसोडे, शरद बनसोडे, शितल बनसोडे, रोहित बनसोडे, प्रशांत क्षिरसागर, विशाल पवार, बुध्दभुषण वजाळे, सिध्देश्वर हांडे, सर्व रा. अकोले ता. माढा शुभम कोंडाळकर रा. शेलगाव मनोज जाधव रा. जेऊर दोघे ता. करमाळा किरण वाघमोडे, रा. बादलेवाडी, ऋषिकेश गरड रा. उपळवाटे, रोहित सरक रा. बादलेवाडी सर्व ता. माढा यांना अटक करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा