पोलीस पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

31

परभणी : परभणी शहरामधील खानापूर परिसरात पतीने आपल्या पोलीस पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. त्यानंतर स्वत:वरही वार करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील खानापूर परिसरामध्ये कृष्णा माने व त्यांची पत्नी कमल जाधव-माने हे राहत होत्या. अनेक दिवसांपासून या दोघांत सतत भांडणे होत होती. शनिवार, १४ मार्च रोजी दुपारी ३ च्या सुमारास या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा माने याने शस्त्राने पत्नी कमल जाधव-माने हिच्यावर एकापाठोपाठ अनेक वार केले. त्यामुळे पत्नीचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
पत्नीच्या खुनानंतर कृष्णा माने यास पश्चाताप झाला. यानंतर त्याने धारदार शस्त्राने स्वत:च्या अंगावरही सपासप वार केले व त्यातच तोही मृत्युमुखी पडला.
कमल जाधव ही नानलपेठ पोलीस ठाण्यात नोकरीला होती. कृष्णा माने हा पिंपरी देशमुख (ता. परभणी) या गावाचा असून, तो शेती करत होता. या दोघांना दोन वर्षांचा एक मुलगा आहे. या घटनेनंतर घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तट यांनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा