गोल पोस्ट आरोग्य पुण्यात कोरोनाने वाहतूक विभागातील पोलिसाचा मृत्यू

पुण्यात कोरोनाने वाहतूक विभागातील पोलिसाचा मृत्यू

पुणे, दि.२१ मे २०२०: पुण्यामधील आणखी एका कोरोना योध्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना संबंधित वाहतूक पोलिसाची प्राणज्योत मालवली. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत दोघा पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात एकूण २६ पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून त्यातील तेरा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर अकरा जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापूर्वी फरासखाना पोलिस स्थानकातील सहाय्यक फौजदाराचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version