पोलिसांनी फिरणाऱ्या तरुणांना टाकले रुग्णवाहिकेत..!

5

तामिळनाडू, २५ एप्रिल २०२०: कोरोना विषाणूबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून कित्येक प्रकारे मोहिम राबविण्यात येत आहेत. संसर्ग टाळण्यासाठी घरी राहणे किती महत्वाचे आहे हे लोकांना समजावून सांगितले जात आहे. यात रस्त्यांवरील पेंटिंगपासून ते लोकांना करायला लावलेल्या वेगवेगळ्या कसरती पर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर पोलिस संगीताच्या माध्यमातून देखील जनजागृती करत होते.

पण तिरुपूर पोलिसांनी तमिळनाडूमध्ये ज्या प्रकारची मोहीम राबविली ती लोकांना केवळ हसण्यापूर्ती नाही तर एक प्रकारचा संदेशही देत ​​आहे. तिरुपूर पोलिसांचा हा प्रमोशनल व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. तामिळनाडू पोलिसांचा हा अनोखा प्रचार व्हिडिओ लोकांना लॉकडाऊनचे महत्त्व सांगण्यासाठी खूप आवडला आहे. तसेच, याला तिरुपूर पोलिसांचे एक अनोखे पाऊल म्हणून हि बोलले जात आहेत.

तिरुपूर पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की पोलिसांनी प्रथम दुचाकींवर विनाकारण फिरणाऱ्या ५ युवकांना रोखले. त्यांच्यापैकी बहुतेकांनी ना मास्क बांधले होते ना डोक्यावर हेल्मेट होते. त्यानंतर पोलिसांनी पाचही जणांना रुग्णवाहिकेत बसण्यास सांगितले. त्या रुग्णवाहिकेत आधीच एक रुग्ण झोपलेला होता पोलिसांनी त्या पाच युवकांना सांगितले की हा रुग्ण कोरोना संसर्गित आहे. पोलिसांनी असे बोलतच या युवकांची जी धावपळ सुरू झाली ती बघण्या योग्य आहे. हास्यास्पद रित्या ते युवक पाळण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

रुग्ण वाहिकेमध्ये चढवू नये म्हणून या पाच जणांनी हात पाय मारण्यास सुरुवात केली. त्यांनी मोठ्याने रडण्यास सुरवात केली. व्हिडिओच्या शेवटी महिला पोलिस अधिकारी जाहिरातीच्या व्हिडिओमागील हेतू सांगत आहेत. अधिकारी म्हणतात, “लॉकडाऊनचे महत्त्व लोकांना समजत नाही आणि घराबाहेर पडतात … अनावश्यकपणे घराबाहेर पडून स्वत: ला किती धोका असतो हे त्यांना माहिती नाही.” बाहेर गेल्यानंतर ते कसे व कुठे आजारी पडतील हे माहित नाही .. आयुष्य किती मौल्यवान आहे हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओद्वारे करण्यात आला आहे.

पोलिसांनी हे स्पष्ट केले की ही वास्तविक घटना नव्हती तर प्रमोशनल व्हिडिओसाठी ती मुलं आणि रुग्ण यांनी अभिनय केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर लोकांनी तिरुपूर पोलिसांचे कौतुक केले. ट्विटरवर व्हिडिओ सामायिक करताना बरेच लोक म्हणतात की हे लोकांना पटवून देण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा