राजकीय दबावामुळे कैद्यांचा वैद्यकीय पाहुणचार वाढतोय, ससून रुग्णालयातून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी फरार प्रकरण

पुणे, ५ ऑक्टोबर २०२३ : आर्थिक घोटाळा प्रकरणातील कैद्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यासाठी थेट राज्यातील राजकीय वरिष्ठांकडूनच ससून प्रशासनावर दबाव आणला जात आहे. डिस्चार्ज कार्डवर सही करणाऱ्या डॉक्टरांना घरचा रस्ता दाखविण्याची धमकीही दिली जात असल्याची धक्कादायक माहिती ससूनमधील एका डाॅक्टरने दिलीय. ससून रुग्णालयातून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील पळून गेल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कैद्यांची तातडीने तपासणी, उपचार करून त्यांना वेळेत डिस्चार्ज का दिले जात नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र राजकीय व्यक्तींच्या वरदहस्तांने कैदी तळ ठोकून बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये कैद्यांना ऍडमिट केले जाते. वार्डमध्ये रुग्णालयातील एक सफाई कामगार आणि एक नर्स एवढाच स्टाफ असतो. वॉर्ड मध्ये ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कैद्यांची जबाबदारी असते.

कैद्यांना तपासणीसाठी घेऊन जाताना त्यांच्या सोबतीला पोलीस गार्ड दिले जातात. कोणतीही मोठी तपासणी अथवा शस्त्रक्रिया करायची असल्यास कोर्टाची ऑर्डर आवश्यक असते. याबाबत विचारणा केल्यास बरेचदा पोलीसांकडून डॉक्टरांवर अरेरावी केली जात असल्याचे चित्र समोर येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा