देशातील कोणत्याही क्रिकेट असोसिएशन मध्ये राजकारण आणले जात नाही – शरद पवार

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२२ : एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले, अनेक वर्षांपासून मी क्रिकेटशी संबंधित संस्थांमध्ये आहे. त्यामध्ये मीच काय इतरही राजकारणी कधी राजकारण आणत नाहीत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत युती करत अमोल काळे यांना निवडून आणले. या आपल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देताना ते पुढे म्हणाले कि, मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी होते. मोदी माझ्या बैठकीला हजर राहत. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. अरुण जेटली दिल्लीचे तर अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष होते. मी देशाचा अध्यक्ष आणि हे सगळे राज्यांचे अध्यक्ष असं आम्ही सर्वांनी तेव्हा एकत्र काम केलं. याठिकाणी आम्ही कधीही राजकारण आणत नाही.

पुढे ते म्हणाले.. देशातील विविध खेळ प्रकारामध्ये एकसूत्रता आणणे, त्या त्या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणे, त्या खेळाचं प्रमोशन करणे, योग्य ते इन्फ्रास्ट्रुक्चर निर्माण करणे, जेणेकरून देशात उत्तमोत्तम खेळाडू तयार होतील व त्याची ख्याती जगभर पसरेल अशा चांगल्या विचाराअंती आम्ही एकत्र येतो.

सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्यासारखे उभं आयुष्य क्रिकेटला योगदान दिलेल्या लोकांच्या ज्ञानाचा उपयोग नवीन खेळाडू निवडणे आणि त्यांना तयार करणे यासाठी व्हायला हवा. हे काम त्यांचं आहे. त्यांना उद्या स्टेडियम बांधायचे काम जमणार नाही. ते काम आमचं आहे. कोणते खेळाडू निवडायचे हे काम त्यांचे आहे. आशिष शेलार जवळपास ५ वर्षांपुर्वीही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. काही क्षेत्रं अशी असतात, जिथे राजकारण आणायचे नसते. खेळाडूंना प्रोत्साहित करणे, त्यांना खेळासाठी विविध सुविधा देणे, हे आमचे काम आहे. त्यांच्या खेळात आम्ही कधी पडत नाहीत. असेही ते म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा