शिवरायांच्या नावाने राजकारण करणे थांबवावे

पुणे ; २५ जुलै २०२२: दिवंगत इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांचं लिखाण आणि भाषणे यामुळे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय झाला असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते . शरद पवारांचं हे वक्तव्य केवळ चुकीचे नसून निंदनीय आहे अशी टीका ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली.

यावेळी दवे यांनी पवारांना टोला लगावला कि बाबासाहेब यांचा अभ्यास आणि मांडणी खोटी असेल तर शरद पवारांनी शिवचरित्र लिहून महाराजांना न्याय मिळवून द्यावा . ब्राम्हण समाजासोबत शरद पवार यांनी मागे एक बैठक बोलावली होती, त्यावेळी आम्ही त्यांची भेट नाकारली हेच बरोबर होते हे आज पुन्हा सिद्ध झाले असे आनंद दवे यांनी सांगितले. पवारांनी त्यांना योग्य वाटेल असे शिवचरित्र लिहावे व त्यात महाराजांना ब्राम्हण शत्रू, सेक्युलर, इस्लामचे प्रेमी,आरक्षणाचे समर्थक दाखवावे आणि त्यांनी महाराजांना न्याय द्यावा ,त्याचे प्रकाशन आम्ही करू असे दवे म्हणाले.

शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे कौतुक केलेला व्हिडीओ आमच्याकडे आहे ,त्याबद्दल स्पष्टीकरण करून स्वतःचीच माफी मागावी अशी मागणी देखील दवे यांनी केली. याला आता शरद पवार काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी;

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा