गोल पोस्ट गुन्हा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अरुण राठोडच्या घरी चोरी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अरुण राठोडच्या घरी चोरी

बीड, १७ फेब्रुवरी २०२१: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अरुण राठोड या तरुणाच्या घरी चोरी झाली आहे. कथित ऑडिओ क्लिप मध्ये या तरुणाचं नाव वारंवार येताना दिसत आहे. वनमंत्री संजय राठोड याच्याशी या ऑडिओ क्लिप मध्ये संवाद साधताना अरुण राठोड निदर्शनास येत आहे. पूजा चव्हाण या तरुणीने पुणे येथील वानवडी येथील आपल्या राहत्या इमारतीच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. विरोधी पक्षांकडून देखील संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तथापि या प्रकरणातील महत्त्वाचा व्यक्ती मानल्या जाणाऱ्या अरुण राठोड या तरुणाच्या घरी चोरी झाल्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात एक नवीन वळण आले. चोरीच्या माध्यमातून या प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट केले जात आहे का असा प्रश्न देखील आता पुढे येऊ लागला आहे.

अरुण राठोड हा बीडमधील धारावती तांडा या गावात राहतो. नुकताच तो वन खात्यात रुजु झाला होता. पूजा चव्हाण अरुण राठोड च्या फ्लॅट मध्येच वास्तव्यास होती. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी अरुण सुद्धा फ्लॅटमध्येच होता. दरम्यान बीड मधील घरात झालेल्या चोरीत दिलेल्या फिर्यादीनुसार एक लाख रुपयांची रोख रक्कम व ८० हजार रुपयांचे दागिने असे एकूण एक लाख ८० हजारांची चोरी केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version